व्यापम घोटाळ्यातील सर्व 31 आरोपी दोषी
मध्यप्रदेशातील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळामध्ये (व्यापम) झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय कोर्टानं सर्व 31 आरोपींना दोषी ठरवलं आहे. याबाबत येत्या 25 नोव्हेंबरला रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
व्यापम घोटाळ्याप्रकरणी सीबीआयननं सर्व 31 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. हे सर्व आरोपी जामिनावर होते. मात्र कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानं या आरोपींना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
व्यापमकडून झालेल्या सरकारी नोकरीमधील गडबडीप्रकरणी अनेक एफआयआर दाखल करण्यात आले होते. व्यापम घोटाळ्याशी संबंधित 26 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.