मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (14:56 IST)

उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं - अनुराग कश्यप

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुंबईत सुरक्षित वाटतं, असं मत सिनेदिग्दर्शक अनुराग कश्यप याने व्यक्त केले आहे.  
 
"मी कुणाचीही बाजू घेत नाही. पण मला महाराष्ट्रात खरंच सुरक्षित वाटतं. इथे मी माझे मत खुलेपणाने मांडू शकतो. गेल्या काही काळात ज्या गोष्टी बदलल्या आहेत. ते पाहून शिवसेनेबद्दलचं माझं मत पूर्ण बदललं आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यामुळे हे घडले आहे. मी उद्धव ठाकरे यांच्या मताशी सहमत नसेलही पण मला महाराष्ट्रात कायम सुरक्षित वाटतं," असं अनुराग कश्यप म्हणाला.
 
अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त करत मुंबईला 'पाकव्याप्त कश्मीर' आणि 'पाकिस्तान'ची उपमा दिली होती. मुंबई सुरक्षित नसल्याचेही विधान तिने केले होते.
 
कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी आपलं मुंबईवर प्रेम असल्याचे ट्वीट केलं होतं.