शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जुलै 2019 (08:42 IST)

गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात 'जादूटोणाविरोधी कायद्याचा' समावेश

गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने 'जादूटोणाविरोधी कायद्याचा' समावेश अभ्यासक्रमात केला आहे. या कायद्याचा समावेश करणारे गोंडवाना विद्यापीठ राज्यातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे.
 
"सर्वाधिक पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची देशात ओळख आहे. तरीही राज्यात अंधश्रद्धा, जादूटोण्याच्या अनेक घटना समोर येतात. अंधश्रद्धेतून छोट्या बाळापासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत आणि स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे जादूटोणाविरोधी कायदा तयार करून अभ्यासक्रमात त्याचा समावेश करावा," अशी मागणी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी सातत्याने लावून धरली होती.
 
विद्यापीठाच्या विधिसभेच्या बैठकीत या कायद्याचा' समावेश बी.ए. अंतिमच्या समाजशास्त्र विषयात करण्याचा निर्णय झालेला आहे. सविस्तर चर्चेअंतीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे, असं गोंडवाना विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ.चंद्रशेखर भुसारी यांनी म्हटलं आहे.