रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (08:38 IST)

गृहमंत्रालयाने थकवला CRPF रसद निधी

केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) केंद्र सरकारकडून निधी न मिळाल्याने जवानांना दिला जाणारा रेशन निधी बंद करण्याचे आदेश CRPFने दिले आहेत. केंद्राकडून देण्यात येणारा 800 कोटींचा अतिरिक्त निधी उपलब्ध न झाल्याने नाईलाजास्तव हा निर्णय घेण्यात आला.
 
गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारित असणाऱ्या केंद्रीय गृहमंत्रालयाशी तीन वेळा संपर्क करूनही CRPFला हा निधी देण्यात आला नसल्याचं समजतं.
 
दरम्यान CRPF जवानांना देण्यात येणारा रेशन निधी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जवानांकडे अन्नधान्यासाठी पैसे नाहीत हा आरोप चुकीचा, तर्कहीन आणि भांडखोर हेतून केला असल्याचं CRPFने म्हटलं आहे.