रविवार, 16 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

फडणवीस दिल्लीत गेल्यास महाराष्ट्राला उपयोगच होईल - खडसे

If Fadnavis goes to Delhi
"देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत गेले, तर आनंदच होईल, स्वागत करेन. शिवाय ते दिल्लीत गेल्यास महाराष्ट्राला अधिक उपयोग होईल," असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले.
 
"दिल्लीत येणं, न येणं हे फडणवीसांच्या मर्जीवर नाही, तर वरिष्ठ नेत्यांनी तसा निर्णय ठरवल्यास होऊ शकतो," असंही खडसेंनी म्हटलं.
 
देवेंद्र फडणवीस गेल्या आठ दिवसांपासून दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी आले होते. महाराष्ट्रात परतण्याआधी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस केंद्रात येणार का, यावरुन चर्चा सुरु झाली होती. त्या पार्श्वभूमीवर खडसेंनी प्रतिक्रिया देताना फडणवीसांना टोला लगावला.