बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (12:19 IST)

भारताचं औद्योगिक उत्पादन 4.3 टक्क्यांपर्यंत घसरलं

भारतातील कमकुवत अर्थव्यवस्थेचं प्रतिबिंब औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकामध्ये उमटलं आहे. सप्टेंबरमधील औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी नोंदवला गेलाय. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक 4.3 टक्क्यांपर्यंत घसरला आहे.  
 
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हा निर्देशांक जाहीर केला.
 
निर्मिती, कोळसा आणि पोलाद तसंच ऊर्जा क्षेत्रातल्या कमी निर्मितीमुळं सप्टेंबरमधील औद्योगिक उत्पादन घसरलं. तसंच, भारतातील औद्योगिक उत्पादन क्षेत्रांमधील 23 पैकी 17 क्षेत्रांची कामगिरी नकारात्मक राहिली आहे.
 
यापूर्वी सप्टेंबर 2018 मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादनाचा दर 4.6 टक्के इतका होता.
 
दरम्यान, वाहन उद्योगात मात्र विक्री वाढल्यानं काहीसा दिलासा मिळालाय. ऑक्टोबरमध्ये प्रवासी वाहन विक्री 0.28 टक्क्य़ांनी वाढून 2 लाख 85 हजार 27 वर पोहोचलीय. लोकसत्तानं ही बातमी दिलीये.