शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

मांगशोर झोल

साहित्य : मटण - 500 ग्रॅम, 2 कांदे, 1 टोमॅटो, 2 लसूण पाकळ्या, 1 तुकडा आलं, एक चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला, एक चमचा तेल, 1 चमचा तूप, मीठ चवीनुसार.

कृती : सर्वप्रथम आलं, लसूण, टोमॅटो आरी कांद्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी. नंतर कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मटणाचे तुकडे घालून शिजवून घ्यावे. नंतर कढईत तेल गरम करून मटणाचे तुकडे तेलातून काढून घ्यावे. आता आलं-लसूण-काद्याची पेस्ट घालावी. नंतर त्यात हळद-तिखट घालून तेल सोडेपर्यंत ते मिश्रण परतावे. आता त्या मिश्रणात मटण घालून 2 कप पाणी, मीठ घालून 20 मिनिट शिजवावे. तूप व गरम मसाला घालून सर्व्ह करावे.