शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान

WD

मुन्नार आणि त्याजवळील भागातील एक महत्वाचे आकर्षण म्हणजे इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान होय. हे उद्यान मुन्नारपासून साधारण 15 किलोमिटर दूर अंतरावर असून लुप्तप्राय होत चाललेला प्राणी नीलगिरी टारसाठी हे ओळखले जाते. 97 चौ. किमी. अंतरापर्यंत पसरलेले हे उद्यान दुर्मिळ जातीची फुलपाखरे, वन्यजीव आणि पक्षांच्या अनेक दुर्लभ जातींचे आश्रयास्थान आहे. हे स्थान ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहे. उद्यानातील चहाचे विस्तृत मळे आणि त्याचबरोबर पर्वतरांगावर वेढलेली धुक्याची दाट चादर यांचे एक मनमोहक दृष्य येथे पहावयास मिळते. नीलकुरिंजीच्या फुले फुलल्यानंतर प्रथम पसंतीचे ठरते. हे झाड पश्चिमी घाटातील या भागातील येतात. याआधी 2006 साली याला फुले आली होती.