शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

रोहतांग पास..

WD
मनाली पासून लद्दाख रोडवर पाच-सात किलोमिटर दूरवर असलेले ठिकाण.... आह... एकदम सुंदर...ज्याबद्दल तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही असा निसर्ग पाहावयास मिळतो. येथे तुम्हाला असे वाटते की आपण बर्फाच्या समुद्रात उभे आहोत... अत्यंत सुंदर... मनाली जावे तर रोहतांग पास जरूर पहावा. येथे वर्ष भर बर्फ जमलेलेच असते... त्यामुळे कधी ही जा...! तसेच मनाली पासून दर्या पर्यंत चालतच जावे लागते (खेचर/घोडी मिळतात पण चालत जाण्याची मजा काही औरच) ह्या मार्गात जो आनंद भेटतो तो कुठेच भेटणार नाही....

मनाली मध्ये फिरण्याचा खर्च नाहीच असे समजा... जर गाईड घेतला तर गोष्ट वेगळी. कारण जवळ-जवळ सर्व मनाली चालतच फिरावे लागते... कारण डोंगर दर्‍यांचा प्रदेश त्यामुळे 4 बाय 4 गाडी असणे गरजेचे, त्यापेक्षा चालत फिरलेले छान व जेव्हा बर्फ पडतो तेव्हा गाडी खूप वेगाने घसरतात त्यामुळे मनालीत गाडी ही ठराविक जागे पर्यंतच जाऊ शकते. नग्गार ही मनालीची राजधानी मानली जाते. येथे एक लहान पण सुंदर राजवाडा आहे. राजवाडा हा लाकडाचा आणि दगडांचा बनलेला असून त्यावर सुंदर कोरीव काम आहे.