जगप्रसिद्ध नायगारा धबधबा!

niyagra fall
वेबदुनिया|
WD
उत्तर अमेरिका खंडातील प्रेक्षणीय व अपूर्व देखाव्यापैकी एक धबधबा. हा कॅनडा व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या सरहद्दीवर आणि ईअरी व आँटॅरिओ या सरोवरांना जोडणार्‍या नायगारा नदीवर आहे. गोट बेटामुळे या धबधब्याचे दोन भाग झाले आहेत. कॅनडाकडील धबधब्यास 'कॅनडियन फॉल्स' किंवा 'डॉर्सशू फॉल्स' व अमेरिकेकडील धबधब्यास 'नायगारा फॉल्स' किंवा 'अमेरिकन फॉल्स' असे म्हणतात. अमेरिकेत किंवा कॅनडात यूरोपीय लोकांच्या वसाहती होण्याच्या आधीपासून अनेक इंडियन जमातींना हा धबधबा चांगला माहित होता. प्रथम फारद हेनेपिन याने 1678 व 1683 मध्ये या धबधब्यास भेट देऊन प्रथम याचे वर्णन लिहिले.

एकूण पाण्याच्या फक्त 6 ट्के पाणी अमेरिकन फॉल्सवरून वाहते. बाकीचे पाणी कॅनडातील नालाकृती धबधब्यावरून वाहते. वाहते पाणी गाळरहित असल्यामुळे धबधब्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. कॅनडाच्या बाजूकडील क्वीन हिक्टोरिया पार्कपासून आणि अमेरिकन फॉल्सजवळील प्रॉस्पेक्ट पॉइंटपासून धबधब्यांचे सौंदर्य फारच आकर्षक दिसते. रात्रीच्या वेळी धबधब्याचे पाणी जेथे काली पडते, तेथे रंगीबेरंगी प्रकाशांची सय करण्यात आल्याने व आजूबाजूला मोठमोठी उद्याने असल्याने, येथे प्रवाशांची फार वर्दळ असते. 1941 मध्ये नायगारा नदीवर 'रनबो ब्रिज' नावाचा पूल बांधण्यात आला असून त्यावरून धबधब्याचे सौंदर्य चांगले पाहता येते. धबधब्यास पुरेसा पाणीपुरवठा व्हावा आणि त्याचा देखावा कायम टिकावा म्हणून कॅनडा व अमेरिका या देशांमध्ये 1950 साली एक करार झाला. त्यानुसार पर्यटक हंगामात दर सेकंदास कमीत कमी 3000 घ.मी. पाणी आणि इतर वेळी दर सेकंदास कमीत कमी 15,000 घ. मी. पाणी सोडले जाते. बाकीच्या पाण्यापासून मोठ्या प्रमाणात जलविद्युत निर्माण केली जाते. तसेच अमेरिकन फॉल्सला पुरेसे पाणी मिळावे म्हणून त्यास कालव्याने पाणीपुरवठा केला जातो. नालाकृती धबधबा वर्षाला 1.524 मी. या वेगाने मागे सरकत आहे. अमेरिकेतील धबधब्यामुळेही खालच्या खडकांवर मोठा परिणाम होत असून 1969 मध्येनदी काही काळ दुसरीकडे वळवून त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. पंचमहासरोवर जलमार्गात हा धबधबा ही एक अडचणच आहे. ती धबधबा टाळून जाणार्‍या वेलंड कालव्याने दूर केली आहे. या धबधब्यांशी संबंधित असलेले ऐतिहासिक आणि प्राकृतिक इतिहास साहित्य न्यूयॉर्क राज्यातील नायगारा फॉल्स शहराच्या नायगारा फॉल्स म्युझीयममध्ये आहे.

संबंधित माहिती


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...