लडाख हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे, या ठिकाणाचे सौंदर्य मन मोहतात

Last Modified मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (16:47 IST)
लडाख हे उत्तरेत काराकोरम आणि दक्षिणेला हिमालय पर्वत यांच्यामध्ये वसलेले एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे, जिथे त्याचे आश्चर्यकारक सौंदर्य लोकांना आकर्षित करते. लडाख हे भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. येथे बर्फाने झाकलेले उंच पर्वत पाहून असे वाटते की जणू आपण स्वर्गात आलो आहोत. ट्रेकिंगची आवड असलेल्या लोकांमध्ये लडाख खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय येथे कॅम्पिंग करणे हे देखील रोमांचक आहे. येथील सुंदर तलाव आणि बर्फाच्छादित पर्वत मनाला ताजेतवाने करतात. जर आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी भेट देण्याचा विचार करत असाल तर आपण नक्कीच लडाखला जायला हवे. पांगोंग तलाव हे येथील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. सुमारे 43,000 मीटर उंचीवर स्थित हा तलाव हिवाळ्याच्या हंगामात पूर्णपणे गोठतो. अशा स्थितीत या ठिकाणाचे सौंदर्य आणखी वाढते.लडाख मध्ये भेट देण्यासारखी इतर ठिकाणे कोणती आहेत ते जाणून घ्या

* चुंबकीय टेकडी
लडाखमध्ये अशी एक टेकडी आहे, ज्याला मॅग्नेटिक हिल म्हणतात. कारण ही टेकडी वाहने वरच्या दिशेने खेचते. असे म्हटले जाते की जर एखादी कार सुरू न करता येथे सोडली गेली तर ती कार स्वतःहून 20 किलोमीटर प्रति तास वेगाने खाली उतरू शकते. यामुळेच हे ठिकाण लोकांना त्याकडे आकर्षित करते.

* फुगताल मठ
लद्दाखच्या मैदानामध्ये हा एक अतिशय प्राचीन आणि अद्भुत मठ आहे, जो त्याच्या घडण आणि सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हा मठ दोन हजार वर्षांपेक्षा जुना असल्याचे सांगितले जाते. ट्रेकिंग प्रेमींसाठी हे खूप खास ठिकाण आहे. म्हणून जर आपण कधी लडाखला भेट दिली तर या ठिकाणाला भेट द्यायला विसरू नका.

* खारदुंग ला पास
लडाखमध्ये स्थित, हे ठिकाण नुब्रा आणि श्योक दऱ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. पाच हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य आणि हवे मुळे असे वाटते की आपण जगातील सर्वात उंच शिखरावर उभे आहात.




यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

श्री दत्तक्षेत्र कडगंची

श्री दत्तक्षेत्र कडगंची
औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर अशी पवित्र दत्तस्थाने सगळ्यांनाच परिचित आहेत, पण त्याशिवायही ...

मराठी जोक : तो सिनेमा मी आधी पहिला होता

मराठी जोक : तो सिनेमा मी आधी पहिला होता
दिनेश- काल मी माझ्या बायको ला माझ्या ड्रॉयव्हर बरोबर सिनेमाला जाताना पाहिलं

BBM3 - बिगबॉस मराठी च्या घरात हुकुमशहांची आव्हाने

BBM3 - बिगबॉस मराठी च्या घरात हुकुमशहांची आव्हाने
सध्या मराठी कलर्स वर रियालिटी शो बिगबॉस मध्ये आदिश वैद्य, स्नेहा वाघ आणि तृप्ती देसाई या ...

तीर्थक्षेत्र जेजुरी

तीर्थक्षेत्र जेजुरी
जेजुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक शहर आहे. हे खंडोबाच्या ...

‘अहमदनगर महाकरंडक’१२ जानेवारीपासून असा करा अर्ज पूर्ण

‘अहमदनगर महाकरंडक’१२ जानेवारीपासून असा करा अर्ज पूर्ण माहिती
अहमदनगर : राज्यातील हौशी कलावंतांच्या नाट्याविष्काराला प्रोत्साहन देणारी, मराठी-हिंदी ...