शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : बुधवार, 22 जून 2022 (08:53 IST)

'या' ठिकाणी गणपतीची सर्वात उंच मूर्ती आहे, जगभरातून लोक भेट द्यायला येतात

thailand city of ganesh
भारतात गणपती हे आराध्य आणि लाडके दैवत आहे. भारतात गणपतीला समर्पित अनेक मंदिरे आहेत. देशाच्या विविध भागात गणेशाची विविध रूपात पूजा केली जाते. पण आपल्याला हे  माहित आहे का की गणपतीची सर्वात उंच मूर्ती भारतात नाही तर परदेशात आहे. होय, गणपतीची सर्वात उंच मूर्ती थायलंडमध्ये आहे. चला  जगातील सर्वात उंच गणपतीच्या मुर्तीबद्दल जाणून घेऊया.
 
थायलंडमधील ख्लोंग ख्वेन शहरातील एका आंतरराष्ट्रीय उद्यानात गणपतीची  सर्वात उंच मूर्ती आहे. हे शहर चाचोएंगसाओ आणि 'सिटी ऑफ गणेश ' म्हणूनही ओळखले जाते. गणपतीची मूर्ती 39 मीटर उंच असून ती कांस्य धातूची आहे. गणपतीची ही मूर्ती फार जुनी नसून ती 2012 साली पूर्ण झाली. ही मूर्ती काश्याच्या  854 वेगवेगळे भाग मिसळून तयार केली आहे. ही मूर्ती थायलंडच्या राजकन्येने स्थापित केली होती.
 
या मूर्तीमध्ये गणपतीच्या मस्तकावर कमळाचे फूल ठेवले जाते आणि मध्यभागी ओम तयार केला आहे. या मूर्तीमध्ये गणेशाच्या हातात चार पवित्र स्थाने दर्शविली आहेत ज्यात फणस, आंबा, ऊस आणि केळी यांचा समावेश आहे. ही सर्व फळे थायलंडमध्ये पवित्र कार्यात वापरली जातात. गणेशाच्या पोटाभोवती साप गुंडाळलेला आहे आणि सोंडेत लाडू आहे. मूर्तीमध्ये उंदीर गणेशाच्या पायाशी बसलेला दिसतो. त्याच्या हातात ब्रेसलेट आणि पायात दागिने आहेत. थायलंडमध्ये गणपतीची भाग्य आणि यशाची देवता म्हणून पूजा केली जाते.
 
याशिवाय थायलंडच्या फ्रांग अकात मंदिरात गणपतीची 49 मीटर उंचीची मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये गणपतींना बसलेले दाखवले आहे. त्याच वेळी, थायलंडमधील समन वट्टा नरम मंदिरात गणपतीची 16 मीटर उंचीची मूर्ती आहे.गणपतीची ही मूर्ती पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे येतात.