शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. देश-विदेश
Written By वेबदुनिया|

हिल स्टेशनची राणी सिमला

WD
केवळ हिमाचल प्रदेशाची राजधानी म्हणूनच प्रसिद्ध आहे असे नव्हे तर हिलस्टेशनची राणी म्हणून सिमल्याचे अधिक महत्व आहे. 12 किलोमीटर पसरलेल्या या परिसरात पर्यटकांसाठी अनेक मॉल्स, चित्रपटगृहे आणि सांस्कृतिक केंद्रे आहेत. नालदेरा या ठिकाणी गोल्फ, क्रिकेट, फुटबॉलची मैदानंही आहेत.

समुद्रसपाटीपासून सुमारे 7262 फूट उंचीवर असलेल्या या गावाला 1864 पासून ब्रिटिशांची उन्हाळी राजधानी म्हणून अधिकच महत्त्व प्राप्त झालयं. इथून 2 कि. मी. वर वसलेल्या जाखू हिलची उंची 800 फूट आहे. त्यावरून संपूर्ण शहराचं विहंगम दृश्य काही औरच दिसतं.