मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. बॉलीवूड 2010
Written By वेबदुनिया|

बॉलीवूड 2010 आणि मतभेद!

बॉलीवूड सेलिब्रिटीज सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे ते नेहमीच विवादात असतात. तर आता बघूया वर्ष 2010चे काही चर्चित विवाद :


वर्ष 2009च्या शेवट्या आठवड्यात रिलीज झालेले ‘3 इडियट्स’ने फार यश मिळविले तर चेतन भगत म्हणाला की चित्रपटात त्याचे नाव फारच शेवटी दिले असून त्याला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

आयपीएल 3 मध्ये शाहरुख खानने पाकिस्तानी क्रिकेटर्सला सामील करण्याचा उल्लेख केल्याने शिवसेनेचा संताप त्याला पत्करावा लागला.

मुंबईमध्ये ‘माय नेम इज खान’च्या रिलीजच्या वेळेस फारच अवघड परिस्थिती निर्मित झाली होती.

संजय दत्तने मायावतीला जादूची झप्पी देण्याची गोष्ट म्हटली तर बदल्यात त्याला कडू नोटिस मिळाले.

सलमान खानने घरा बाहेर वॅनिटी वॅन उभी केली तर त्याच्यावर 1200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

अजय देवगनने गोव्यात सार्वजनिक स्थळावर धूम्रपान केल्यामुळे त्याला दंड चुकवावा लागला.

मुन्नी बदनाम हुई गाण्यात झंडू बामचे नाव घेतल्यामुळे झंडू बामवाले नाराज झाले. मलायका अरोरा ने त्यांच्या कंपनीच्या
जाहिरातीसाठी काम करण्यासाठी होकार दिले तेव्हा ते थोडे नरम पडले.

राखी सावंतने ‘राखी का इंसाफ’शो मध्ये एका पुरुषाला नामर्द म्हटले आणि त्या शॉकने त्याची मृत्यू झाली म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी राखीच्या विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला.

देओल परिवाराची मिमिक्री करणाऱ्या एका रेडियो स्टेशनाच्या विरुद्ध सनी असा भडकला की त्या रेडियो स्टेशनाने देओल
परिवाराची मिमिक्री करणे बंद केली.

अनुराग कश्यपने अमिताभ बच्चनावर आरोप लावला आहे की त्याने ‘चितगाँव’ची रिलीज डेट फक्त यासाठी पुढे वाढविली कारण अभिषेकचे चित्रपट 'खेलें हम जी जान से'चा आणि या चित्रपटाचा विषय एक सारखाच आहे.

अभिजीत सावंतची मैत्रीण प्राजक्ता शुक्रेने आपल्या कारने दोन मुलांना धडक मारली. तिच्या बचावासाठी गेलेल्या अभिजितला लोकांनी पिटले.

एका चॅरिटी इवेंटमध्ये भाग घेण्यासाठी गेलेल्या याना गुप्ता अंडरवियर घालायची विसरली असून तिचे फोटो काढण्यात आल्यामुळे ती बरेच दिवस चर्चेत राहिली.

बिग बॉसमध्ये दाखवण्यात येत असलेली अश्लीलतेच्या विरुद्ध उत्तर प्रदेश स्थित अलीगढच्या न्यायालयात केस लावण्यात आला आहे. 'शो'च्या निर्माते शिवाय सलमान खानच्या विरुद्ध देखील खटला दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टर्स फॉर यू नावाच्या संस्थेने ‘गुजारिश’च्या त्या पोस्टर्स आणि सीनचा विरोध केला आहे ज्यात ऐश्वर्या रायला सिगारेट ओढताना दाखविले आहे.

दयानंद राजन नावाच्या व्यक्तीने दावा केला आहे की ‘गुजारिश’ त्याचे अप्रकाशित उपन्यास ‘समर शो’वर आधारित आहे.

‘बँड बाजा बारात’चे हिरो रणवीर सिंहचा दिल्लीत जाताना एका यात्रेकरुशी यावरून वाद झाला की तो नाही म्हटल्यावरसुद्धा अनुष्का शर्माचे फोटो काढत होता.

‘कजरारे’चे निर्माता भूषण कुमारने बीन कुठल्याही प्रचार-प्रसाराचे ‘कजरारे’ चित्रपट मुंबई आणि पुण्यातील एक-एक सिनेमागृहात रिलीज केले आहे ज्याने त्याचे सॅटेलाईट्स राइटसं विकता येतील. चित्रपटाचे हिरो हिमेश रेशमिया हैराण आहे पण तो या विषयावर काहीच करू शकत नाही.