1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By wd|
Last Modified: मुंबई , सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (15:15 IST)

अमिताभ बच्चन आजारी, शूटिंग रद्द

बॉलिवूडचा सुपरस्टार अमिताभ बच्चन सध्या तापाने फणफणला असून, आजारामुळे त्याने आगामी चित्रपट 'पीकू'चे शूटिंगही रद्द केले आहे. ७१ वर्षीय महानायक अमिताभने सुजीत सरकारच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला गेल्याच आठवड्यात सुरुवात केली होती, ज्यात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि इरफान खान यांच्याही भूमिका आहेत. 
 
अमिताभने शनिवारी रात्री ट्विट केले की, 'आत्ताच कळले की, शरीरात ताप आहे.' अमिताभ आजारातून अद्यापही पूर्णपणे ठीक झालेला नाही. त्याने रविवारी ट्विट केले की, 'अजूनही ताप आहे, शूटिंग रद्द झाले, त्यामुळे मी दु:खी आहे; परंतु उद्यापर्यंत पूर्णपणे ठीक होईन, आता विश्रांती घेत आहे.' अमिताभची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना करणार्‍या सर्व चाहत्यांचे त्याने आभार मानले आहेत.