1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

कॅटरिनाचा हॉट फोटो व्हायरल

अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बार बार देखो’ या सिनेमातील कॅटरिना आणि सिद्धार्थ यांच्यातील रोमान्स सीनचा फोटो व्हायरल होत आहे. या सीनमध्ये कॅटरिना ऑरेंज कलरच्या बिकिनीमध्ये आहे. 
 
सुमद्रात शूट केलेला हा फोटो कॅटरिना, सिद्धार्थ आणि निर्माता करण जोहर यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेली दोन दिवस हा फोटो सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर शेअर झाला आहे. या सिनेमातून दोघांतील केमिस्ट्री दाखवण्याचा प्रयत्न झाला असून त्यात चित्रपटाच्या टीमला नक्कीच यश आले आहे. 
 
कॅटरिनाचा यापूर्वीचा ‘फितूर’ हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच आपटला होता. साहजिकच ‘बार बार देखो‘ मधून तिला मोठय़ा आपेक्षा आहेत. कॅटरिनाला हीट सिनेमा देऊन बरेच महिने गेले असल्याने तिला एका बॉक्सऑफिस हीटची मोठी गरज आहे. 
 
‘बार बार देखो’ या सिनेमातील ‘काला चष्मा’ हे गाणे सध्या युटय़ूबवर ट्रेडिंगमध्ये आहे. यापूर्वी या सिनेमातील एक फोटो रिलीज झाला होता. पहिला फोटो ‘हळुवार, रोमँटिक’ असा होता. तर आता प्रसिद्ध करण्यात आलेला फोटो मात्र सुपर हॉट म्हणता येईल असा आहे.