1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 9 एप्रिल 2014 (12:59 IST)

जोडी क्या बनायी

बिग बीपासून सनी लिऑनपर्यंत बॉलिवूडमधल्या प्रत्येकाला सध्या यो यो हनीसिंगसोबत काम करायचं आहे. त्याच्या गाण्यांनी तरुणाईला वेड लावलं आहे. शेकडो सुंदर मुली त्याच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असताना यो योला मात्र रोमान्स करायचाय देसी गर्ल प्रियांका चोप्राबरोबर. तो या विश्वसुंदरीच्या प्रेमातच पडलाय असं दिसतंय. अलीकडेच एका जाहीर कार्यक्रमात त्याने तसं बोलून दाखवलं. हनीसिंग लवकरच ’एक्सपोजे’ चित्रपटातून अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकतोय. प्रियांकाही सध्या गाणी गाण्यात माहिर बनलीय. त्यामुळे तिचं गाणं आणि याचा अभिनय हे त्यांच्यातले समान दुवे आहेत. भविष्यात ते दोघे एका सिनेमात काम करतानाही दिसू शकतील. त्यामुळे ‘वाह वाह रामजी.जोडी क्या बनायी’ असं म्हणण्याची वेळ लवकरच येणार बहुदा.