1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

दबंग 3 मध्ये परिणिती?

प्रेक्षकांचा सलमानच्या ‘दबंग’ सीरिजला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता दबंगच्या आगामी तिसर्‍या भागाची उत्सुकता आहे. त्याप्रमाणे सलमानसोबत कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार याचीही चर्चा आहे. तिसर्‍या सिक्वेलमध्ये सोनाक्षी सिन्हाच्या जागी परिणिती चोप्राची निवड होण्याचे संकेत मिळत आहेत. पहिल्या दोन भागांमध्ये चुलबुल पांडे साकारणार्‍या सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा झळकली होती. मात्र तिसर्‍या भागात सोनाक्षीऐवजी नवा चेहरा दिसण्याची शक्यता असून अनेक अभिनेत्रींना मागे टाकत परिणितीला ही संधी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. 
 
सलमान खान सोनाक्षीसोबत काम करण्यास फारसा उत्सुक नसल्यामुळे निर्मता अरबाज खानने नव्या चेहर्‍याचा शोध सुरु केला आहे. अरबाजचा ‘डॉली की डोली’ सोनाक्षीने नाकारल्यामुळे अरबाज नाखूश होता, त्यातूनच सोनाक्षीला हटवल्याची चर्चा आहे. 
 
दबंग 3 च्या पटकथेवर सध्या काम सुरु असून पुढल्या वर्षी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल.