1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 6 जुलै 2015 (11:01 IST)

रिअँलिटी शोमध्ये सनीसोबत छेडछाड!

बॉलिवूड अभिनेत्री आणि होस्ट सनी लिओनसोबत एका रिअँलिटी शोमध्ये छेडछाड झाल्याचे वृत्त आहे. सनी सध्या ‘स्प्लिट्सविला 8’ हा शो होस्ट करत असून या शोमध्ये एका स्पर्धकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप तिने केला आहे. सनीने हा आरोप शोच्या गेल्या पर्वातील स्पर्धक पारस छाबरावर लावला आहे. पारस छाबरा ‘स्प्लिट्सविला’च्या सातव्या सिझनचा विजेता आणि अभिनेत्री सारा खानचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आहे. सनी आता शोच्या निर्मात्यांवर याप्रकरणी अँक्शन घेण्याचा दबाव टाकत आहे.
 
सनी शोची होस्ट असून तिला सर्व स्पर्धकांसोबत बातचीत करावी लागते. शूटदरम्यान पारस आपल्या विनोदाने सनीला इम्प्रेस करण्याचा आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला सनीने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र जेव्हा तो मर्यादा ओलांडू लागला तेव्हा सनीने शोच्या निर्मात्यांकडे याची तक्रार केली. प्रॉडक्शन टीमने पारसला ताकीद दिल्याचे समजते. सूत्रांनी सांगितले, की शूटदरम्यान सेटवर सनीचे पती डेनियल वेबरसुद्धा उपस्थित असतात. त्यामुळे सनीला त्रास देण्याची कुणीही हिंमत करत नाही. मात्र पारस तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे सनीने प्रॉडक्शन हाउसला विनंती केली आहे, की त्यांनी शो लाँचला पारसला बोलावू नये.