1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By wd|
Last Modified: पुणे , शनिवार, 19 जुलै 2014 (11:01 IST)

रोहित नारंग यांनी माझा ‍विनयभंग केला-पूजा म‍िश्रा

बॉलिवूडची अभिनेत्री ईशा कोप्पीकरचे पती रोहित नारंग आणि  राहुल नारंग  या दोघांनी आपला विनयभंग केल्याचा  आरोप अभिनेत्री पूजा मिश्रा हिने केला आहे. पूजाने पुण्यात पत्रकार  परिषदेत हे आरोप केले.

पूजाने सां‍गितले की, रोहित आणि राहुल यांची 14 वर्षांपासून माझी  ओळख आहे. दोघे गेल्या नऊ महिन्यांपासून माझा छळ करत  आहे.विशेष म्हणजे शरीरसुखाची मागणीही त्यांनी केली होती. मात्र  मी त्यांन स्पष्‍ट नकार दिल्याने त्यांनी माझे अश्लील फोटो प्रसिद्ध  करण्‍याची धमकी दिली. यापूर्वी  2009 मध्ये दोघांच्या विरोधात  पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

तक्रार मागे घेण्यासाठी दोघांनी माझी समजूतही काढली होती. त्यास  मी नकार दिल्याने दोघांनी मला गाडीत बसवले. मला गुंगीचे औषध  देऊन माझा विनयभंग केला. तसेच मला जिवे मारण्याचीही धमकी  दिल्याचा आरोप पूजा मिश्रा हिने केला.