1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

लहानपणी कुणालाही आवडत नव्हती कैटरीना

बॉलीवूड बार्बी गर्ल कैटरीना कॅफने म्हटले की ती शाळेत असताना कुणालाही ती आवडत नव्हती. असे म्हणार्‍या कैटचे आज लाखो फॅन्स आहे पण तिने सांगितले की मी कर्क राशीची असल्यामुळे लाजाळू होते. मी कुणाशी गप्पा मारत नव्हते. तेव्हा मी अगदीच लोकप्रिय नव्हते आणि लोकांनाही मी आवडायचे नाही.
 
शाळेत माझा पहिला मित्र एक भारतीय होता आणि तो माझ्याशी खूप चांगला वागायचा. जेव्हा मी 16 वर्षाची झाले तेव्हा मी मित्र बनवायला सुरुवात केली.
 
कैटरीना म्हणाली की मी ज्या व्यक्तीला डेट करेन त्याचे व्यक्तिमत्व, त्याचा ऑरा अर्थात प्रभाव आणि आकर्षणवर लक्ष देईन. तिने म्हटले की माझा पार्टनर सकारात्मक असला पाहिजे. त्यातून एक वेगळीच सुगंध यायला हवी.