1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सुहानाच्या बिकिनी फोटोबाबत शाहरुख खान म्हणतो..

अभिनेता शाहरुख खानने अखेर मुलगी सुहानाच्या बिकिनीवरील फोटोबाबत मौन सोडलं आहे. त्याने असं काही उत्तर दिलं की, सर्वाचं तोंड बंद झालं. काही दिवसांपूर्वी बिकिनीवरील सुहानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सुहानासोबत तिचा लहान भाऊ अबरामही होता. बिकिनीवरील सुहानाचा हा फोटो चर्चेचा विषय बनला होता.

शाहरुखला याबाबत विचारलं असता तो म्हणाला की, सुहाना बीचवर तिच्या भावासोबत बिकिनीवर होती. पण मीडियासाठी मुलीचा बिकिनीवरील फोटो हेडलाईनचा विषय बनला. हे वाईट नाही का? माझी मुलगी 16 वर्षाची आहे आणि या चर्चेमुळे तिला अतिशय ऑकवर्ड वाटत आहे. माझ्या स्टारडममुळे ही छोटी गोष्ट मोठी बनली. या ठिकाणी जर कोणाचा न्यूड फोटो असता तर काहीही फरक पडला नसता. पण ती माझी मुलगी असल्याने; एवढी निगेटिव्ह चर्चा झाली. शाहरुखचं हे उत्तर अनेकांच्या तोंडाला कुलूप लावणारं आहे.