रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘बिग बॉस’मध्ये सलमानसोबत दीपिका

सलमान खानसोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण ‘बिग बॉस’च्या 10 व्या पर्वात झळकणार आहे. हॉलिवूडचा अँक्शन आणि थरार आपल्याला दीपिकामुळे बिग बॉसच्या सेटवर पाहायला मिळणार आहे. 
 
‘ट्रिपल एक्स द रिटर्न ऑफ एक्सेंडर केज’ या चित्रपटातून दीपिका हॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. अलीकडेच ती सलमान खानसोबत ‘बिग बॉस’साठी शूटिंग करीत असल्याची बातमी आली आहे. 
 
कलर्स चॅनलचे सीईओ राज नायक यांनी या बातमीला दुजोरा देणारे ट्विट केले आहे. यात, बिग बॉस शोच्या लाँचिंगसाठी दीपिका येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे. त्यांनी सोबत एक व्हिडिओही प्रदर्शित केलाय. 
 
यात दीपिका येणार्‍या सीझनमध्ये थ्रिलिंग राईड होणार असल्याचे प्रेक्षकांना सांगताना दिसते.