शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

'बिग बॉस'मधून डेलनाझ बाहेर!

WD
'बिग बॉस-6'चे स्लोगन 'अलग छे' असे आहे आणि त्याची प्रचितीही आली. ज्या डेलनाझ इराणीकडे या शोची विजेती म्हणूनच पाहिले जात होते तिला चक्क सर्वात कमी मते मिळाल्याने तिला मंगळवारी रात्री घराबाहेर पडावे लागले. तत्पूर्वी दिवसभर या घरातील एका मॉनिटरवर तिलाच सर्वाधिक मते मिळाल्याचा ग्राफ दाखवला जात होता. मात्र, त्यात तिच्या नावावरील सर्वाधिक मते ही तिला घरात ठेवण्यासाठी नव्हती, ते नंतर स्पष्ट झाले.

मंगळवारी मध्यरात्री 'बिग बॉस'ने सर्वांना गार्डन एरियात बोलावून सांगितले की आता तुमच्यापैकी एकाची गच्छन्ती होणार आहे. त्यानंतर डेलनाझला सर्वात कमी मते मिळाल्याचे सांगून तिला घराबाहेर पडण्यास फर्मावण्यात आले. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. डेलनाझ इराणी या घरात ऑक्टोबरमध्ये शो सुरू झाला, त्यावेळेपासून होती व तिच्या शांत, संयमी वागण्यामुळे ती विजेती होईल, असे अनेकांना वाटत होते. राजीव पॉलबरोबर तिचा अलीकडेच घटस्फोट झाला आहे. तोही या शोमध्ये असल्याने दोघांकडे सर्वांचे लक्ष असे व दोघांच्या खासगी गोष्टींची शोमध्ये बरीच चर्चाही झाली. या शोचा विजेता शनिवारी घोषित होणार आहे.