शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

'शोले'च्या सिप्पींना अखेरचा सलाम

NDND
शोले या अजरामर चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांचे नाव चिरंतन रसिकांच्या लक्षात राहिल असे ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक जी. पी. सिप्पी यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी (ता.२५) मुंबईत निधन झाले.

सिप्पी यांचा जन्म पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या हैदराबाद येथे १९१५ मध्ये झाला होता. भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांनी विद्यार्थीदशेत भाग घेतला होता. त्याचा परिणाम म्हणून त्यांना तुरूंगातही जावे लागले होते. त्यानंतर ते वकिल झाले.