रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 23 जुलै 2018 (08:44 IST)

अॅश-अभी अनुराग कश्यपच्या‘गुलाब जामुन’मध्ये एकत्र

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन २०१० मध्ये आलेल्या रावण या चित्रपटामध्येही स्क्रिन शेअर केली होती. त्यानंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसली नाही. मात्र आता तब्बल आठ वर्षांनंतर ही जोडी एकत्र स्क्रिन शेअर करणार असून त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘गुलाब जामुन’असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
‘गुलाब जामुन’हा चित्रपट अनुराग कश्यपच्या प्रोडक्शनअंतर्गत तयार करण्यात येणार असून सर्वेश मेवारा या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या चित्रपटाची घोषणा लवकरच करण्यात येणार असून चित्रपटाची कथा आवडल्यामुळे अॅश-अभीने त्यांचा होकार कळविला आहे.