शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

जेव्हा अरबाज खानची प्रेयसी जॉर्जियाला अर्पिता म्हणाली, 'दुपट्टा सांभाळ'

मलायका अरोराशी घटस्फोट झाल्यानंतर आता अरबाज खान मॉडल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. दोघे सोबत फिरतात आणि अलीकडेच हा कपल काँग्रेस नेता बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत सामील झाला. या पार्टीत अरबाज आणि जॉर्जिया यांच्याव्यतिरिक्त सलमान खान, अर्पिता खान, आयुष शर्मा, कॅटरीना कैफ आणि यूलिया वंतूर देखील सामील होते.
 
पार्टीत जॉर्जियाने ऑफ व्हाइट रंगाचा लहंगा घातला होता आणि दुपट्टा गळ्याला चिकटून होता. या पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात अरबाजची बहीण अर्पिता खान आणि जॉर्जिया एंड्रियानी आपसात बोलताना दिसत आहे. अर्पिता यात जॉर्जियाला आपलं दुपट्टा खाली करण्यासाठी सांगत असल्याचे कळून येत आहे.
 
जॉर्जियाने ब्रॉड नेक टॉप घातला होता आणि ती लोकांची भेट घेत होती. अशात तिच्या ड्रेसवर अर्पिताची नजर पडली आणि तिने जॉर्जियाला बोलावून आपला दुपट्टा व्यवस्थित करायला सांगितला.
 
जॉर्जियाने अर्पिताचं ऐकलं आणि दुपट्टा खाली केला. नंतर पूर्ण पार्टीत जॉर्जिया दुपट्टा खाली करूनच लोकांना भेटली.
 
सूत्रांप्रमाणे अरबाज, जॉर्जिया विवाह बंधनात अडकण्याबद्दल विचार करत आहे.