आर्यन खानला एनसीबीकडून क्लिनचिट

Aryan Khan
Last Modified शुक्रवार, 27 मे 2022 (14:22 IST)
कार्डिलिया क्रुजवर अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एनसीबीने शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला क्लिनचिट दिली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने कोर्टात 6000 पानांचं आरोपपत्र दाखल केलं. आर्यन विरोधात कोणताही पुरावा नसल्याचं त्यांनी मांडलं आहे.

यापूर्वी काय घडलं?
आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांनाही कोर्टाने जामीन 28 ऑक्टोबर 2021 रोजी मंजूर केला होता. कोर्टाने दोन ते तीन दिवस या प्रकरणाची सुनावणी घेतली.
या प्रकरणात अटकेत असलेल्यांपैकी आर्यन, अरबाज आणि मुनमुन या तिघांनी कोर्टासमोर जामीन अर्ज दाखल केला होता.

सध्यातरी या तिघांना जामीन मिळाला असून बाकीच्या आरोपींनी अर्ज केल्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
27 ऑक्टोबरला न्यायालयात काय झालं?
आरोपी 1,2,1 यांचा युक्तिवाद आज पूर्ण झाला. पुढील युक्तिवाद उद्या दुपारी 3 वाजता होईल असं मुनमुन धमेचाचे वकील काशिफ खान देशमुख यांनी सांगितलं.

आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाझ यांच्या जामीन अर्जावर झालेल्या युक्तिवादानंतर उद्या एनसीबीतर्फे अनिल सिंग युक्तीवाद करतील.
"मी फॅशन मॉडेल आहे, मी स्टेज शो करते, रॅम्प वॉक करते, माझ्या व्यावसायिक कारणानिमित्त मला क्रुझवर बोलवण्यात आलं होतं", असं मुनमुन धमेचातर्फे बाजू मांडण्यात आली.
काल आर्यन खानचे प्रतिनिधित्व प्रसिद्ध विधिज्ञ आणि माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी केले. या युक्तिवादादरम्यान ते म्हणाले, आर्यन खान निर्दोष आहे.

रोहतगी म्हणाले, "आर्यन कॅलिफोर्नियतात शिकत होता 2020 ला भारतात आला. त्याला पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं. अरबाजलाही बोलावण्यात आलं होतं. दोघही एकत्र पोहोचले."

"बहुदा NCB ला क्रूजवर लोक ड्रग्ज घेणार असल्याची माहिती होती. त्यामुळे ते मोठ्या संख्येने उपस्थित होते," असं रोहतगी म्हणाले.
'अरबाज मर्चंटच्या बुटात ड्रग्ज सापडले तर या प्रकरणात आर्यन कसा दोषी ठरेल?' असा प्रश्न रोहतगी यांनी विचारला.
याआधी, मुंबईच्या एका विशेष एनसीबी कोर्टानं आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

वृत्तसंस्था ANI नुसार, आर्यन खान याच्यासहित अरबाज मर्चंट आणि इतर 8 आरोपींचीही कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
याचा अर्थ उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास या सगळ्यांना 30 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत राहावं लागणार आहे.
याआधी ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये अटकेत असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी गुरूवारी सकाळी शाहरूख खानने भेट घेतली तर त्याच वेळी एनसीबीचे पथक शाहरूखचे निवासस्थान 'मन्नत' या ठिकाणी चौकशीसाठी दाखल झालं.
आर्यनला अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच शाहरुखने मुलाची भेट घेतली. त्याच दिवशी एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून शाहरुख खानच्या घरी तपास करण्यात आला.

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, "आर्यन खान प्रकरणाच्यासंबंधी तपास करण्यासाठी एनसीबी अधिकारी शाहरुख खानच्या घरी गेले होते. हा कुठल्याही प्रकारचा छापा नव्हता." असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जेलमध्ये कोरोनासंसर्ग पसरण्याच्या भीतीमुळे आर्थररोड जेल प्रशासनाने वकील आणि कुटुंबीयांना कैद्यांची भेट/मुलाखत बंद केली होती.
कोरोनासंसर्ग नियंत्रणात असल्याने 21 ऑक्टोबरपासून जेल प्रशासनाने कोरोना नियम पाळत कैद्यांना भेटण्यासाठी परवानगी पुन्हा सुरू केलीये.

मुलाला भेटण्यासाठी शाहरूख पोहोचला जेलमध्ये
गुरूवारी सकाळी 9 वाजता अभिनेता शाहरुख खान मुंबईच्या आर्थररोड जेलमध्ये पोहोचला.

ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला शाहरुखचा मुलगा आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलंय.
पोलिसांच्या बंदोबस्तातात शाहरुख मुलाला भेटण्यासाठी जेलमध्ये दाखल झाला.

शाहरुख आर्यनला भेटण्यासाठी आज कसा पोहोचला?
कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका पाहाता आर्थर रोड जेल प्रशासनाने वकील आणि कैद्यांच्या कुटुंबीयांना कैद्यांना जेलमध्ये भेटण्यावर बंदी घातली होती.

त्यामुळे आर्थर रोड जेलमध्ये कैदेत असलेल्या कैद्यांची भेट शक्य नव्हती.

महाराष्ट्रात सद्यस्थितीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. त्यामुळे आर्थर रोड जेल प्रशासनाने वकील आणि नातेवाईकांना कैद्यांना भेटण्याची परवानगी दिलीये.
आर्थर रोड जेल प्रशासनाने याबाबतची नोटीसही जेलबाहेर लावली आहे.

या नोटीसमध्ये असं लिहिण्यात आलंय, "बंदी नातेवाईक आणि वकील प्रत्यक्ष भेट/मुलाखत कोरोनाबाबात सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करून 21 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येत आहेत."

"एकावेळी कैद्याच्या जास्तीत जास्त दोन नातेवाईकांनाच भेट घेता येईल."

शाहरुख-आर्यन समोर आल्यावर काय घडलं?
मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात शाहरूख खान आणि आर्यनची 15-20 मिनिटं भेट झाली.
सुरुवातीला टोकन देऊन शाहरुख खानला तुरुंगात प्रवेश देण्यात आला.

दोघांच्या भेटीदरम्यान 4 सुरक्षा रक्षक त्याठिकाणी उपस्थित होते.

शाहरुख खान आणि आर्यन खान यांच्यात ग्लास पार्टिशन लावण्यात आलेलं होतं.

तुरुंग प्रशासनाकडून मिळालेला भेटीचा वेळ संपल्यानंतर शाहरुख खान स्वतःहून निघून गेला, अशी माहिती मिळाली आहे.

आर्यनच्या अटकेवेळी शाहरूख परदेशी होता
2 ऑक्टोबरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खानला ड्रग्जप्रकरणी ताब्यात घेतलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खान त्यावेळी दुबईत होता.
त्यामुळे त्याला आर्यन खानची भेट घेता आली नव्हती.

आर्यन खानचे वकील त्याला NCB कार्यालयात येऊन भेटले होते.

आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरूखने NCB च्या कार्यालयात फोनवर आर्यनशी चर्चा केल्याची माहिती समोर आली होती.

आर्यन खानचा जामीन का फेटाळण्यात आला?

न्यायमूर्ती व्ही व्ही पाटील यांनी आर्यन खानची जामीन याचिका का फेटाळण्यात आली याबाबत आपल्या आदेशात खालील मुद्दे नमूद केले आहेत -
1. आरोपी नंबर 1 (आर्यन खान ) आणि आरोपी नंबर 2 ( अरबाज मर्चंट) मित्र आहेत. दोघांनी आपल्या जबाबात जवळ ड्रग्ज असल्याचं आणि सेवन केल्याचं मान्य केलंय. त्यामुळे आर्यन खानला अरबाजकडे ड्रग्ज असल्याची माहिती होती.

2. कोर्टाला दाखवण्यात आलेल्या Whats App चॅटवरून दिसून येतं की, आर्यन खानचे (आरोपी नंबर 1) अज्ञात लोकांसोबत ड्रग्जबाबत चॅट आहेत. जास्त प्रमाणात ड्रग्ज आणि हार्ड ड्रग्जबद्दल बोलण्यात आलंय. प्राथमिक पुराव्यांनुसार आर्यन खानचे ड्रग्जशी संबंधित लोकांसोबत संबंध होते.
3. What's App चॅट मधून दिसून येतं की आर्यन खानचे (आरोपी नंबर 1) ड्रग्ज सप्लायर्स आणि पेडलर्ससोबत संबंध आहेत

4. आरोपींनी संगनमताने हा गुन्हा केला.

5. आरोपी ड्रग्जशी संबंधित मोठ्या नेटवर्कचे भाग आहेत

6. आर्यन खानची जामिनावर मुक्तता केली तर तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो या सरकारी पक्षाच्या युक्तिवादाशी सहमत आहे.

7. What's App चॅटवरून आरोपी नंबर 1 (आर्यन खान) ड्रग्ज कारवायांशी संबंधित आहे असं दिसून येतं. जामीनावर असताना पुन्हा असा गुन्हा करणार नाही असं म्हणता येणार नाही
त्यामुळे या आरोपांना जामीन देणं योग्य ठरणार नाही.

पुढील सुनावणी 26 ऑक्टोबर रोजी
दरम्यान, आर्यन खान प्रकरणातील जामीन याचिकेवरील आजची सुनावणी स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता मंगळवार, 26 ऑक्टोबर रोजी होईल, अशी माहिती मिळाली आहे.

न्यायमूर्ती N W सांबरे यांच्यासमोर आर्यनची जामीन याचिका दाखल आहे.
यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

नवरा बायको जोक - अर्ध डोकं दुखतं

नवरा बायको जोक - अर्ध डोकं दुखतं
बायको - नेहमी माझं अर्ध डोक दुखत असत... असं वाटत डॉक्टरला दाखवायला हवं...

नवरा -बायको मराठी जोक - पासवर्ड सांगा

नवरा -बायको मराठी जोक - पासवर्ड सांगा
नवरा - माझ्या छातीत खूपच दुखत आहे... ताबडतोब डॉक्टरला फोन लाव...

मोबाईल बाजूला ठेवणे...

मोबाईल बाजूला ठेवणे...
आजकाल पाहुण्यांच्या पाया पडायलाच हवं असं काही नाही ... त्यांना पाहून हातातील मोबाईल ...

'बालिका वधू'च्या दिग्दर्शकाचे निधन

'बालिका वधू'च्या दिग्दर्शकाचे निधन
मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जीवनातील आकर्षक कथांवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जाणारे ...

केरळमधील मुन्नार हे हनिमूनसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे, येथे ...

केरळमधील मुन्नार हे हनिमूनसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे, येथे भेट देण्याची सर्वोत्तम वेळ जाणून घ्या
मुन्नार हे दक्षिण भारतातील काश्मीर म्हणून ओळखले जाते.आकर्षक भूप्रदेशाच्या कुशीत वसलेले, ...