1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 एप्रिल 2017 (15:58 IST)

64 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

यंदाच्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत  कासव या मराठी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांत अव्वल क्रमांकाचे सुवर्णकमळ पटकावले आहे. याशिवाय दशक्रिया हा मराठीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. राजेश मापुस्करांच्या व्हेंटिलेटर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलन आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्‍सिंग या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.  कासव हा मराठी चित्रपट सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही.
 
* सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ) – कासव
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राजेश मापुस्कर (व्हेंटिलेटर)
* सर्वोत्कृष्ट अभिनेता – अक्षय कुमार (रुस्तम)
* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मनोज जोशी (दशक्रिया)
* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – झायरा वासिम (दंगल)
* आधारित पटकथा – दशक्रिया
* सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सायकल
* सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्‍सिंग – व्हेंटिलेटर
* सर्वोत्कृष्ट संकलन – व्हेंटिलेटर
* सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्‍ट्‌स – शिवाय
* सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- नीरजा
* सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – दशक्रिया
* स्पेशल मेन्शन – अभिनेत्री सोनम कपूर (नीरजा)
* फिल्म फ्रेण्डली राज्याचा पुरस्कार उत्तर प्रदेशला
* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – झायरा वासिम (दंगल)
* सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट – पिंक