मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (16:45 IST)

इरॉस नाऊने स्वरा भास्कर अभिनीत मानवी तस्करीवर आधारित शो 'फ्लेश' चा ट्रेलर केला प्रदर्शित!

इरॉस नाऊने आपल्या मनोरंजक आणि सर्जनशील कन्टेन्टसह जगभरातील प्रेक्षकांचे सतत मनोरंजन केले असून लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओरिजनल रोमांचक गुन्हेगारी ड्रामा 'फ्लेश' सादर करण्यास सज्ज झाली आहे. ही सीरीज 21 ऑगस्ट 2020 पासून इरोस नाऊवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.
 
आपल्या 8 रहस्यमय भागांसह, प्रत्येक भाग 40 मिनिटांचा असून यामध्ये स्वरा भास्कर, अक्षय ओबेरॉय, युधिष्टीर, विद्या माळवदे आणि महिमा मकवाना अशा दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. ही डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ओरिजिनल गुन्हेगारी-थ्रिलर आहे जी मानवी तस्करीचे भयानक वास्तवावर प्रकाश टाकेल. कामगार, वेठबिगारी आणि शोषणासाठी लोकांची तस्करी हा एक सर्वश्रुत जागतिक प्रश्न आहे. इथले जग हे निराशा, संघर्ष, असमानता आणि लोभांनी भरलेले आहे. इरॉस नाऊची ही शक्तिशाली मालिका 'फ्लेश' ही सिद्धार्थ आनंद द्वारे रचित आणि डॅनिश असलम द्वारे दिग्दर्शित करण्यात आली आहे. याची कथा पूजा लाधा सूरती यांनी लिहिली आहे.
 
या शोमध्ये सामर्थ्यशाली अभिनेत्री स्वरा भास्कर ही राधा नौटियाल या कणखर पोलिस अधिकाऱ्याच्या  भूमिकेत दिसणार आहे, जी यातील गूढ उकळण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावते. तिच्यासोबत प्रतिभावान अभिनेता अक्षय ओबेरॉय देखील आहे, जो एक जटिल, गडद व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.
 
'फ्लेश'मध्ये अभिनय करण्याच्या आपल्या अनुभवाबद्दल बोलताना स्वरा भास्कर म्हणाली की, "मानव आणि बाल तस्करी ही जगातील सर्वात हानीकारक वास्तवांपैकी एक आहे आणि हे महत्त्वपूर्ण आहे की एका काल्पनिक कन्टेन्टद्वारे आम्ही हा प्रश्न अधोरेखित करीत आहोत. 'फ्लेश'चा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो आणि या टीमबरोबर काम करणे हा एक पूर्णपणे आनंददायक अनुभव होता. माझ्या कारकीर्दीत प्रथमच मी एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे आणि मला आशा आहे की यासाठी मला चाहत्यांचे कौतुक आणि प्रेम मिळेल. यात ते मला काही हाई-ऑक्टेन एक्शन सीक्वेंस करताना पाहतील. "
 
इरॉस ग्रुपच्या मुख्य कन्टेन्ट अधिकारी रिधिमा लुल्ला याविषयी बोलताना म्हणाल्या की, “आम्ही नेहमीच आमच्या प्रेक्षकांना सशक्त आणि प्रासंगिक कन्टेन्टचा एक अद्वितीय असा डिजिटल अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. 'फ्लेश' हा इरॉस नाऊची ओरिजिनल सिरीज असून आणि यात तस्करी उघडकीस आणण्याच्या क्रूर प्रक्रियेच्या कथेसह दर्शकांना त्याकडे ओढून घेणारे आणि गुंतवून ठेवणारे सर्व घटक आहेत. या शोमध्ये मानवी तस्करीचे भीषण वास्तव दाखवण्यात आले असून यामध्ये नाट्य आणि थरार यांचे अनोखे मिश्रण आहे."
 
'फ़्लेश’चा प्रीमियर 21 ऑगस्टला केवळ इरॉस नाऊ वर करण्यात येणार आहे.