testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

#HBD करिना कपूर खान, ३९ व्या वर्षात केले पदार्पण

kareena kapoor
Last Updated: शनिवार, 21 सप्टेंबर 2019 (11:50 IST)
मुंबई – बॉलीवूडची बेबो प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर-खानचा आज वाढदिवस आहे. तिने आज 39 वर्षात पदार्पण केले आहे. तिच्या फॅशनसाठी आणि ड्रेसिंग स्टाईलसाठी ती ओळखली जाते. झीरो फिगरचा ट्रेंड बॉलीवूडमध्ये तिनेच आणला. शुक्रवारी रात्री 12 च्या ठोक्याला करिनाने तिच्या कुटुंबियांसोबत तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. यावेळी तिचा पती अभिनेता सैफ अली खान आणि बहिण करिष्मा कपूर यांनी इनस्टाग्रामवर तिच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत.
करिना कपूरने तिची करिअरची सुरूवात रेफ्युजी या चित्रपाटतून केली. हा तिचा डेब्यू सिनेमा होता मात्र तो फ्लॉप झाला. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अभिषेक बच्चनने काम केले होते. रेफ्युजी सिनेमासाठी तिने फिल्मफेअरचा पुरस्कार मिळवला आहे. 2004 मध्ये चमेली या चित्रपटातून तिने सगळ्यांनाच तिच्या अभिनयाने स्तिमित केले. या भूमिकेची दखल फिल्मफेअरने घेतली आणि तिला स्पेशल परफॉर्मन्स हा अवॉर्ड देण्यात आला. 2006 मध्ये तिने ओमकारा चित्रपटासाठी उत्कृष्ठ अभिनेत्रीच 4 थ फिल्मफेअर अवॉर्ड पटकावल. त्यानंतर 2007 मधल्या तिच्या जब वी मेट या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. या सिनेमासाठी तिने उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला. त्यानंतर 2009 मध्ये थ्री इडियट्स साठी तिने पुन्हा एकदा उत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर नाव कोरल.
kareena
गोलमाल रिटर्नस, रा-वन, हिरोईन, जब वी मेट, सिंघम रिटर्नस, एक मै और एक तू, 36 चायना टाऊन, सत्याग्रह, उडता पंजाब अशा असंख्य चित्रपटात तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यानंतर एजंट विनोद, कुर्बान, सिंघम रिटर्नस, गोरी तेरे प्यार मै, बजरंगी भाईजान, या गाजलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर 2018 मध्ये तिने वीरे दी वेडिंगमधून बॉलीवूडमध्ये दणक्यात पुनरागमन केले.
करिना तिच्या फॅशन आणि डाइटच्या बाबतीत खूपच सजग आहे. तिची नृत्याची एक वेगळीच शैली आहे, ती आपण अनेक तिच्या गाण्यांमधून पाहिली आहे. तिने अनेक प्रकारच्या भूमिका आतापर्यंत साकारल्या आहेत. तिच्या आय़ुष्यातील अनेक घडामोडी ती सातत्याने मांडत असते. तिने आतापर्यंत तिच्या प्रेग्नंसीपासून ते अफेअर पर्यंत प्रत्येक गोष्ट मीडियासमोर मांडली आहे. अंग्रेजी मीडियम, गुड न्यूज हे तिचे आगामी सिनेमे आहेत. या चित्रपटांमध्ये तिच्या महत्तवपूर्ण भूमिका आहेत.
karina


यावर अधिक वाचा :

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस ...

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान
कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज ...

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ...

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम ...

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन
यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची ...

मराठी चित्रपट ‘बाबा’चे लॉस एंजलिस येथे ‘गोल्डन ...

मराठी चित्रपट ‘बाबा’चे लॉस एंजलिस येथे ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये प्रदर्शन
ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या वडील आणि मुलाची अत्यंत नाजूक अशी कहाणी असलेल्या ‘बाबा’ या मराठी ...

जोकर: बॅटमॅनच्या नकारात्मक नायकाची कहाणी का ठरतेय

जोकर: बॅटमॅनच्या नकारात्मक नायकाची कहाणी का ठरतेय वादग्रस्त?
'जोकर' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. एरव्ही जोकर म्हटलं की रंगीबेरंगी पोशाख ...

कार्तिकने 'पति पत्नी और वो'चे पोस्टर शेअर केले, भूमीबद्दल ...

कार्तिकने 'पति पत्नी और वो'चे पोस्टर शेअर केले, भूमीबद्दल लिहिले- जरा हाई मेंटेनेन्स हैं हम
कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट 'पति पत्नी और वो'चा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. ...

हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन जाईल पहा.....

हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन जाईल पहा.....
पुणे- कोल्हापूर बसमध्ये दोघेजण. पहिला :- हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन ...

अमीषा पटेलविरुद्ध अटक वॉरंट जारी, आर्थिक फसवणुकीचा आरोप

अमीषा पटेलविरुद्ध अटक वॉरंट जारी, आर्थिक फसवणुकीचा आरोप
अभिनेत्री अमीषा पटेलविरुद्ध रांची हायकोर्टाने अटक वॉरंट जारी केला आहे. चित्रपट निर्माता ...