सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 एप्रिल 2023 (10:01 IST)

Adipurush: हनुमान जयंतीनिमित्त 'आदिपुरुष'चे नवीन पोस्टर समोर, बजरंगी बालीचा लूक पाहून चाहते खूश

adiprush
Instagram
Adipurush New Poster: हनुमान जन्मोत्सवानिमित्त 'आदिपुरुष चित्रपट'चे नवीन पोस्टर चाहत्यांसाठी रिलीज करण्यात आले आहे. 'आदिपुरुष रिलीज'  (Adipurush Release)चे निर्माते, अभिनेते प्रभास आणि क्रिती सेनन यांनी शुभ प्रसंगी राम भक्त बजरंग बालीचा नवीन लूक पोस्टर देखील शेअर केला आहे. आदिपुरुषमधील हनुमानजींचा लूक पाहून चाहते पहिल्यांदाच चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. आदिपुरुषमध्ये बजरंग बलीची भूमिका अभिनेता देवदत्त नाग साकारत आहे.
 
 'आदिपुरुष मुव्ही'चे निर्माता आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी हनुमान जन्मोत्सवानिमित्त बजरंग बालीचा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'आदिपुरुष कॉन्ट्रोव्हर्सी'चे नवीन पोस्टर रिलीज करताना ओम राऊत यांनी सोशल मीडियावर लिहिले, 'रामाचे भक्त आणि रामकथेचा आत्मा...जय पवनपुत्र हनुमान!' हनुमान जन्मोत्सवानिमित्त बजरंग बालीचा लूक पाहून चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे.