सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (17:59 IST)

'मोनिका ओ माय डार्लिंग' ट्रेलरमध्ये राजकुमार राव मृतदेहाची विल्हेवाट लावताना दिसला

rajkumar rao
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि हुमा कुरेशी यांचा नेटफ्लिक्स मूळ चित्रपट 'मोनिका ओ माय डार्लिंग'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये सस्पेन्स, क्राईम थ्रिलर आणि कॉमेडी पाहायला मिळत आहे. या चित्रपटात राधिका आपटे आणि सिकंदर खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
 
ट्रेलरमध्ये राजकुमार राव हुमा कुरेशीच्या जाळ्यात अडकल्याचे दाखवण्यात आले आहे. हुमा त्यांना ब्लॅकमेल करत आहे. दुसरीकडे सिकंदर खेर राजकुमारला खुनाचा सल्ला देतो. राधिका आपटे या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे.
 

ट्रेलरमध्ये राजकुमार राव मृतदेहाची विल्हेवाट लावताना दिसत आहे. राधिका आपटे ही केस वेगळ्या शैलीत सोडवताना दिसत आहे. आता हा मृतदेह हुमाचा आहे की अन्य कोणाचा, हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.
 
'मोनिका ओ माय डार्लिंग' हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बाला करत आहेत. योगेश चांदेकर यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. हा चित्रपट एक डार्क कॉमेडी आहे, ज्यात गुन्हेगारीसह विनोदाची छटा असेल.

Edited by : Smita Joshi