मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2019 (17:34 IST)

कॅटरीना कॅफमुळे 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मधून सरोज खान काढली गेली

बॉलीवूडच्या अनेक गाण्यांना कोरियोग्राफ करणार्‍या सरोजचा जलवा आज-काल बुडला आहे. बॉलिवूड स्टार्सची पहिली पसंत असणार्‍या सरोज खानला आता काम मिळणे देखील अवघड झाले आहे. या दरम्यान सरोज खानने 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाबद्दल एक धक्कादायक वक्तव्य दिले आहे. 
 
2018 मध्ये रिलीज झालेलं चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मध्ये आमिर खान, अमिताभ बच्चन आणि कॅटरीना कैफ यांनी मुख्य भूमिका बजावली. हा चित्रपट सोडल्यापासून चर्चा होती की सरोज खानचे आरोग्य चांगले नाही आणि आता त्यांना कामातून संन्यास घ्यायचा आहे. यावर आता सरोज खानने उघड केले की कॅटरीना कॅफमुळे या चित्रपटात कोरियोग्राफी करू शकता आली नाही. 
 
सरोज खान म्हणाली की 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मध्ये मला आधी कॅटरीनाला कोरियोग्राफ करायचं होतं. पण कॅटरीना रीहर्सलशिवाय नाचण्यास तयार नव्हती. म्हणूनच मला रिप्लेस केलं गेलं. त्यानंतर, सरोज खानऐवजी प्रभुदेवाला कोरियोग्राफर म्हणून निवडलं गेलं. 
 
सरोज खानच्या म्हणण्यानुसार या सर्व गोष्टी करिअरचा भाग असतात आणि त्यांचे कार्य त्यांच्या कौशल्यावर शिक्कामोर्तब करतात. जेव्हा सरोज खानला त्यांच्या करिअरबद्दल विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, मी सध्या रिटाअर होऊ इच्छित नाही. मला एक चांगली ऑफर मिळावी अशी इच्छा आहे जेणेकरुन मी पुन्हा सेटवर परत येऊ शकेन.