शिल्पा शेट्टी-राज कुंद्राचा शर्लिन चोप्रावर ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

raj kundra shilpa shetty
Last Modified बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (08:08 IST)
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिच्या विरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिच्या विरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. शर्लिन चोप्रा हिनं राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात लैंगिक छळ, फसवणूक व धमक्या दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यावर प्रत्युत्तर देत आता राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी शर्लिन चोप्रा हिला थेट कोर्टात खेचलं आहे.
शर्लिन चोप्रानं केलेले सर्व आरोप खोटे आणि तथ्यहिन असल्याचं राज कुंद्रा व शिल्पा शेट्टी यांच्या वकिलांनी म्हटलं आहे. शर्लिन केलेल्या आरोपांविरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा आम्ही कोर्टात केला आहे, असंही वकिलांनी सांगितलं. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांनी शर्लिन चोप्रा हिला नोटीस धाडली असून त्यात तिनं केलेले आरोप खोटे, निराधार आणि तथ्यहिन असल्याचं म्हटलं आहे. समाजात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना बदनाम करण्यासाठी शर्लिन चोप्रानं असे खोटे आरोप केल्याचंही नोटिसीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून आम्ही शर्लिन चोप्रा विरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला असल्याचंही वकिलांनी सांगितलं.
शर्लिन चोप्रा हिनं १४ ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू येथील पोलीस ठाण्यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात खळबळजनक आरोप करत तक्रारीची नोंद केली होती. यात शर्लिन चोप्रा हिनं राज कुंद्रावर लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तसंच फसवणुकीचीही तक्रार केली आहे.यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Dharmendra B'day Spl: बॉलिवूडच्या खऱ्या 'He-Man'चे हे रहस्य ...

Dharmendra B'day Spl: बॉलिवूडच्या खऱ्या 'He-Man'चे हे रहस्य जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
Happy Birthday Dharmendra: बॉलिवूडचा 'He-Man'म्हटला जाणारा अभिनेता धर्मेंद्र आज आपला 86 ...

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १४ ...

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १४ डिसेंबरपासून
१७ डिसेंबर या कालावधीमध्ये प्रसारण होणार आहे. या महोत्सवाच्या बोधचिन्हाचे मंगळवारी (दि. ...

श्रीदत्त क्षेत्र औदुंबर

श्रीदत्त क्षेत्र औदुंबर
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठी वसलेलं औदुंबर हे भारतातील अनेक दत्तक्षेत्रांपैकी ...

मराठी जोक :हा माझा कुत्रा नाही

मराठी जोक :हा माझा कुत्रा नाही
राजूला कुत्रा घेऊन फिरताना बघून मनूने विचारले,

लता दीदींकडून समीर चौघुले यांना खास भेट

लता दीदींकडून समीर चौघुले यांना खास भेट
'महाराष्ट्राची हास्य जत्रा 'फेम समीर चौघुले हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहे. ...