रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 12 जुलै 2021 (14:54 IST)

शाहरुख खान,माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या अभिनित,देवदास चित्रपटाला 19 वर्षे झाली

शाहरुख खान,माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय बच्चन स्टारर फिल्म 'देवदास' 12 जुलै रोजी 19 वर्षे पूर्ण केले.1917 मध्ये शरत चंद्र चट्टोपाध्याय यांच्या लिहिलेल्या याच कादंबरीच्या नावावर अनेक चित्रपट बनले आहेत.2002 मध्ये भन्साळीने हा चित्रपट शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित यांच्यासह बनवला होता. यात शाहरुखने देवदास, ऐश्वर्याने पारो आणि माधुरीने चंद्रमुखीची भूमिका साकारली होती.
 
 44 कोटी रुपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाचे भारताकडून  68.19 कोटी आणि परदेशातून 31.68 कोटी रुपयांचे एकूण संग्रह केले होते. या चित्रपटाला पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दहा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. जरी काही चित्रपट समीक्षकांनी याला जुन्या 'देवदास' पेक्षा कमकुवत म्हटले होते.