बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 12 एप्रिल 2023 (15:23 IST)

सुहाना खान या आंतरराष्ट्रीय सौंदर्य ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर बनली

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी ती नेहमीच चर्चेत असते. सुहाना लवकरच झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे. पण त्याआधी सुहाना एका मोठ्या ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे.
 
सुहाना खान न्यूयॉर्क स्थित ब्युटी ब्रँड मेबेलिनची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. आदल्या दिवशी झालेल्या एका मीडिया इव्हेंटमध्ये सुहानाला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या इव्हेंटमध्ये सुहाना रेड कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
 
मीडियाशी बोलताना सुहाना खान म्हणाली, मी खूप एक्साइटेड आहे. आम्ही या उत्पादनासाठी जे काही शूट केले आहे ते तुम्हाला लवकरच दिसेल. ब्रँड अॅम्बेसेडर होणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे.
 
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सुहाना खानचा आंतरराष्ट्रीय ब्रँडशी संबंध ही तिच्या पोर्टफोलिओमध्ये मोठी उपलब्धी आहे. ती या यशाने खूप खूश आहे.