शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

स्टाईल आयकॉन सनी लिओनी चा " ब्लू" अंदाज !

* सिडनी फिल्म फेस्टिव्हल च्या रेड कार्पेटवर सनीचा अनोखा लूक !
* सिडनी फिल्म फेस्टिवल साठी सनी लिओनीने निवडला सायशा शिंदेचा ड्रेस ! 
 
अभिनेत्री सनी लिओनी तिच्या फॅशन गेममुळे चर्चेत आहे. आधी कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि आता सिडनी फिल्म फेस्टिवल तिच्या फॅशन च्या अनोख्या अदा बघून सगळेच अवाक आहेत. कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये केनेडी चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकल्या नंतर आता हा चित्रपट सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाऊन पोहचला आहे. सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या फॅशन आणि फिल्म दोन्हीच्या चर्चांना उधाण आलं असल्याचं समजतंय ! 
 
सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये केनेडीच्या स्क्रिनिंगसाठी सनीने साईशा शिंदेचा मोहक स्ट्रॅपलेस फिकट निळा फ्लोय ड्रेस घातला आणि सनीच सौदर्य अजून खुलून आलं. हा स्टायलिस्ट लूक हितेंद्र कपोपारा याने स्टाइल केला होता.
 
सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सनी लिओ नी हिने तिच्या फॅशन ने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकून घेतली.  मॉडिश लुक्स आणि फॅशन आयकॉन असलेली सनी या अनोख्या लूक मध्ये मनमोहक दिसत होती. केनेडी हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. केनेडी च्या सोबतीने सनी अनेक नवीन भूमिका मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतय.