है सनननन! अखेर दया बेन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये परतणार; जुनी की नवी?

daya ben
मुंबई| Last Modified मंगळवार, 24 मे 2022 (21:29 IST)
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’या अतिशय लोकप्रिय मालिकेचे लाखो चाहते आहेत. सहाजिकच या मालिकांमधील कलाकार लोकप्रिय आहेत. एखाद्या कलाकाराने मालिका सोडली किंवा त्याचे पुनरागमन झाले तर त्याची लगेच चर्चा सुरू होते. सध्या देखील अशीच एका कलाकारांविषयी चर्चा सुरू आहे.

कलाकार शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो सोडला. तेव्हा अनेकांना मोठा झटका बसला. दरम्यान, ‘तारक मेहता’च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. शोमधील प्रसिद्ध पात्र दया बेन पुनरागमन करणार आहे. बऱ्याच दिवसांपासून दया बेनच्या पुनरागमनाबद्दल अनेक अंदाज बांधल्या जात होते, मात्र चाहत्यांना पुन्हा निराश व्हावे लागले होते. ‘तारक मेहता’मध्ये जेठालाल आणि दया यांचे भांडण पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
असित मोदी यांनी सांगितले की, कोणत्याही चांगल्या वेळी दया बेनला प्रेक्षकांसमोर आणले जाईल. ‘आमच्याकडे दया बेनचे पात्र परत न आणण्याचे कोणतेही कारण नाही. मागील काही काळ आपल्या सर्वांसाठी कठीण गेले आहेत. आता परिस्थिती थोडी चांगली झाली आहे. सन 2022 मध्ये कोणत्याही चांगल्या वेळी आम्ही दया बेनचे पात्र परत आणणार आहोत. जेठालाल आणि दया भाभी यांचे मनोरंजन प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
दिशा वाकाणी दया बेनची भूमिका करणार काय? या प्रश्नावर असित मोदी म्हणाले, ‘दिशा वाकानी दया बेनच्या भूमिकेत परतणार हे मला माहीत नाही. दिशा जीसोबत आमचे अजूनही चांगले संबंध आहेत. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. आता तिचे लग्न झाले असून तिला एक मूल आहे. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात आणि जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होतो. आपल्या सर्वांचे स्वतःचे जीवन आहे. मला यावर काहीही बोलायचे नाही पण दिशा बेन किंवा निशा बेन काहीही असो पण दया बेन नक्कीच परततील.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

प्राथमिक टप्प्यात चित्रपट निर्मितीसाठी 27 चित्रपटांना8 कोटी ...

प्राथमिक टप्प्यात चित्रपट निर्मितीसाठी 27 चित्रपटांना8 कोटी 65 लाख रुपये – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
मुंबई, : चित्रपट निर्मिती अनुदान महामंडळामार्फत दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीसाठी ...

*'दिल से अमीर' प्रथमेश ला ब्लॉकबस्टर सिनेमांची लॉटरी!*

*'दिल से अमीर' प्रथमेश ला ब्लॉकबस्टर सिनेमांची लॉटरी!*
*दगडू इज बॅक*

अल्लू अर्जूनवर नेटकरी संतापले

अल्लू अर्जूनवर नेटकरी संतापले
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन हा त्याचा चित्रपट पुष्पा द राइज रिलीज झाल्यापासून केवळ ...

29 जुलैला झळकणार ‘एक व्हिलन रिटर्न्स’

29 जुलैला झळकणार ‘एक व्हिलन रिटर्न्स’
अर्जुन कपूर, जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि दिशा पाटनीचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘एक व्हिलन ...

साऊथ अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर,अभिनेत्रींच्या पतीचे निधन

साऊथ अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर,अभिनेत्रींच्या पतीचे निधन
साऊथची अभिनेत्री मीनाचे पती विद्यासागर यांच्या निधनाची बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, ...