1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 ऑगस्ट 2017 (17:08 IST)

‘परी’ चित्रपटाच्या सेटवर तंत्रज्ञ ठार

technician-dies-on-the-sets-of-anushka-sharmas-movie-pari

अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आगामी ‘परी’ चित्रपटाच्या सेटवर एका तंत्रज्ञ ठार झाला आहे.  लाईव्ह वायरच्या संपर्कात आल्यामुळे विजेचा धक्का बसून शहाबे आलम नामक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

‘परी’ चित्रपटाच्या सेटवर लाईटिंग डिपार्टमेंटमध्ये टेक्निशियन म्हणून शहाबे काम करत होता. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. आऊटडोअर शूटिंगच्या वेळी शहाबे लाईव्ह वायरच्या संपर्कात आला. शॉक लागल्यानंतर शहाबेला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या घटनेनंतर परी चित्रपटाचं शूटिंग तात्पुरतं थांबवण्यात आलं होतं. दिग्दर्शक प्रॉसित रॉय यांचं पदार्पण असलेला ‘परी’ हा चित्रपट हॉरर लव्ह स्टोरी आहे. अनुष्कासोबत बंगाली अभिनेता परंब्रता चौधरीही या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.