शेफाली शहा दिग्दर्शीत पहिली फिल्म 'समडे' अधिकृतपणे स्टटगार्ट 2021 च्या 18 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात होणार प्रदर्शित!

Last Modified बुधवार, 16 जून 2021 (21:38 IST)
यावर्षी एप्रिलमध्ये, शेफाली शहा दिग्दर्शित पहिला चित्रपट 'समडे' ऑस्कर प्रमाणित '51 व्या वार्षिक यूएसए फिल्म फेस्टिव्हल'च्या आंतरराष्ट्रीय लघुपट आणि व्हिडिओ स्पर्धेसाठी निवडला गेला होता. बहुमुखी अभिनेत्री लिखित आणि दिग्दर्शित हा लघुपट जर्मनीतील स्टटगार्टच्या 18 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात अधिकृतपणे प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट फिचर फिल्म, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म आणि अ‍ॅनिमेशन प्रकारात दाखवला जाईल.
‘समडे’ ही दोन स्त्रियांची कहाणी आहे. त्यांच्यातील नात्याशी संबंधित आहे. विधी, एक फ्रंटलाइन वारियर आहे, जी आजच्या वैद्यकीय स्थितीत अडकली आहे. 15 दिवसांनंतर ती ड्युटीवरून 7 दिवसांच्या विलगीकरणासाठी घरी आली. परंतु, त्याला घर म्हटले जाऊ शकते? जिथे तिच्या आणि तिच्या आईमध्ये फक्त एक अंतर आहे, जे अल्झायमर आहे. ते भूतकाळ आणि भविष्यकाळ याबद्दल बोलतात, ज्यांमध्ये वर्तमानाचा मागमूसही नाही. काही प्रश्न वास्तविक आहेत तर काही काल्पनिक आहेत. त्यांच्यामध्ये जे काही होते, जे असू शकते आणि काय घडू शकते, हे सर्व त्यांच्या नात्याशी संबंधित आहे.
युरोपमधील सर्वात मोठ्या भारतीय चित्रपट महोत्सवांपैकी एक असणाऱ्या,
स्टटगार्टचा 18 वा भारतीय चित्रपट महोत्सव 21 ते 25 जुलै 2021 या कालावधीत होत असून मुख्य प्रवाहातील हिंदी प्रॉडक्शन तसेच डॉक्यूमेंटरी, अ‍ॅनिमेशन आणि शॉर्ट फिल्मसह विविध शैली यामध्ये समाविष्ट आहेत. या व्यतिरिक्त, महोत्सवाच्या आयोजक नवनवीन चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी उत्सुक आहेत. कोविड-19 मुळे, हा चित्रपट महोत्सव ऑनलाईन होणार असून प्रेक्षकांना व्हर्च्युअल उत्सवाचा अनुभव देईल. ऑनलाईन उद्घाटन व पुरस्कार सोहळ्याशिवाय चित्रपटांचे ऑनलाईन स्क्रीनिंगसह प्रश्नोत्तर आणि चित्रपट चर्चेचे सहाय्यक कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात येतील.
या विषयी बोलताना शेफाली शाह म्हणाली की, “जगात पोहोचलेल्या स्टटगार्टच्या 18 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात 'समडे' रिलीज होणार असल्याच्या बातमीने मी किती उत्साही झाले आहे याचे मी शब्दात वर्णन करु शकत नाही. हा एक मोठा सन्मान आहे. जगभरातील चित्रपट महोत्सवांसाठी माझा हा चित्रपट पाठवण्याचा निर्णय योग्य होता,
नवोदित दिग्दर्शक म्हणून माझा स्टँड तपासून पाहण्याची ही संधी होती. त्यामुळेच या प्रतिष्ठित महोत्सवात निवड होणे, हे खूपच आश्वासक आहे."
गेल्या वर्षी अभिनेत्री 'दिल्ली क्राइम' या वेब शोद्वारे आंतरराष्ट्रीय एम्मी अवॉर्ड्समधील सर्वोत्कृष्ट ड्रामा
सिरीजचा पुरस्कार जिंकण्याबरोबरच प्रतिष्ठित जागरण फिल्म फेस्टिव्हल, आयरील अवॉर्ड्स आणि एशियन अ‍ॅकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स (सिंगापूर) येथे समीक्षकांनी गौरवलेला शोसाठी शेफाली शाहने गेल्या वर्षी तीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कारही जिंकले होते.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

"आत्या आहे मी याची"

कधी विचार केला M सरळ आणि W उलटे का लिहितो?

वांगे भरताचे

वांगे भरताचे
वर्गात शिक्षकांनी मुलांना विचारले मुलांनो सांगा

काळजी घ्या

काळजी घ्या
सध्या करोना म्हटलं की लोकांना लगेच काळजी घ्या म्हणण्याची इतकी सवय लागलीय

राज कुंद्रा आणि एकता कपूर यांचे नाव घ्यायला सांगितले, पोर्न ...

राज कुंद्रा आणि एकता कपूर यांचे नाव घ्यायला सांगितले, पोर्न प्रकरणात आरोपी गहना वशिष्ठ यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केला
पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये अडकलेल्या अभिनेत्री गहाना वशिष्ठ यांनी आरोप केला आहे की, मुंबई ...

औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग

औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग
या मंदिराच्या शिल्पकलेची वेरूळ व अजिंठा येथील शिल्पकलेची तुलना करून काही इतिहासकारांनी या ...