सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (16:37 IST)

भाताचे चविष्ट कटलेट

बऱ्याच वेळा भात उरतो, त्या भाताचे आपण चविष्ट कटलेट बनवू शकतो. जे खायला चवदार असतात आणि मुलांना देखील आवडतात.चला तर मग साहित्य आणि रेसिपी जाणून  घेऊ या.
 
साहित्य- 
1 कप शिजवलेला भात,1 कप बारीक चिरलेल्या भाज्या (गाजर,फरसबी,ढोबळी किंवा शिमला मिरची,कांद्याची पात),1 लहान चमचा लसूण,1 लहान चमचा हिरवी मिरची ,2 मोठे चमचे कोथिंबीर,3 मोठे चमचे कोर्नफ्लोर,2 मोठे चमचे पांढरे तीळ,1/2 लहान चमचा काळीमिरपूड,मीठ चवीप्रमाणे ,तेल तळण्यासाठी.
 
कृती-  
सर्वप्रथम  एका कढईत तेल घालून लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्या. 
नंतर सर्व चिरलेल्या भाज्या घालून परतून घ्या मीठ,काळीमिरपूड, घालून मिसळून शिजवून घ्या आणि गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा.
नंतर त्यात शिजवलेला भात,कोर्नफ्लोर,हिरव्यामिरच्या कोथिंबीर घालून मिसळून घ्या आणि कटलेट चा आकार द्या.कटलेट 15 ते 20 मिनिटासाठी फ्रिजमध्ये ठेवा नंतर फ्रिजमधून काढून घ्या.
कढईत तेल तापत ठेवा आणि हे कटलेट त्या गरम तेलात सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या.हे कटलेट हिरव्या चटणी आणि सॉस सह सर्व्ह करा.