शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

अभि-ऐशच्या लग्नाचा वाढदिवस परदेशात

IFM
वीस एप्रिल म्हणजे अभिषेक व ऐश्वर्या यांच्या लग्नाचा वाढदिवस. पण या वर्षी हे दोघेही लग्नाचा वाढदिवस परदेशात साजरा करणार आहेत. दोघांनीही एक आठवड्याचा ब्रेक घेतला आहे आणि सुटी साजरी करण्यासाठी परदेशात गेले आहेत. ते कुठे गेलेत हे मात्र फार थोड्या लोकांनाच माहिती आहे.

गेल्या वर्षी याच काळात अभिषेत 'दोस्ताना'च्या शुटींगसाठी 'मियामी'त गेला होता. त्यावेळी ऐशही तिथे आली होती. या वर्षी दोघेही मणिरत्मम यांच्या रावण चित्रपटाच्या शुटींगमध्ये बिझी होते. पण मणिरत्मम यांची तब्ब्येत बिघडल्याने शुटींग थांबले आहे. ही संधी साधून अभि व ऐश परदेशी गेले आहेत.