शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

कॅट-शाहिद प्रथमच एकत्र

WD
कॅटरिना कैफ बॉलिवूड दिग्दर्शकांची आवडती अभिनेत्री आहे. इम्तियाज अलीच्या फेवरेट लिस्टमध्येही कॅटरिनाचे नाव आहे. आपल्या आगामी होम प्रॉडक्शनच्या सिनेमात कॅटरिनाला कास्ट करायची इम्तियाजची इच्छा आहे. या होम प्रॉडक्शनची हेड इम्तियाजची पत्नी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमात इम्तियाजला शाहीदला मेन लीडमध्ये घ्यायचे आहे.

सगळे काही जुळून आले तर शाहीद लवकरच हा सिनेमा साईनही करेल. अद्याप नाव न ठरलेला हा सिनेमा बॉस्को दिग्दर्शित करणार आहे. इम्तियाजने या सिनेमासाठी कॅटरिनाला भेटण्याचे ठरवले आहे. मात्र अद्याप काहीही निश्चित होऊ शकले नाहीय. आता शाहीद आणि कॅटरीनाला एकत्र घेण्यात इम्तियाजला यश मिळाल्यास या दोघांना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यवर बघण्याची संधी त्यांच्या फॅन्सला मिळणार आहे.