शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 मे 2015 (11:12 IST)

रणबीरनं स्वीकारलं कॅटसोबतचं नातं

अनेक वर्षापासून मीडियामध्ये असलेल्या चर्चेला अखेर अभिनेता रणबीर कपूरनं पूर्णविराम दिलाय. अखेर अभिनेत्री कॅटरिना कैफसोबतचं आपलं नातं त्यानं स्वीकारलं असून पुढील वर्ष अखेरीस आपण विवाहबद्ध होणार असल्याचं त्यानं सांगितलंय.
 
एरवी आपल्या खासगी आयुष्याबद्दल आणि कॅटरिनासोबतच्या नात्याबद्दल रणबीर बोलणं टाळतो. पण एका इंटरव्ह्यूदरम्यान रणबीरनं हे कबूल केलंय. कॅटरिना आणि रणबीरला अनेक वेळा आपण सोबत पाहतो. रणबीर म्हणाला, ‘यावर्षी आम्ही खूप बिझी आहोत, अशात लग्नासाठी वेळ नाहीय. आम्ही पुढल्या वर्षाच्या अखेरीस लग्न करण्याचा विचार करतोय. आम्हा दोघांचंही यावर एकमत आहे.’ तो म्हणतो, ‘आम्हाला आमच्या नात्यावर विश्वास आहे. जर आता आम्ही आपल्या नात्याबद्दल जाहीर खुलासा केला नाही तर तो नात्याचा अपमान असेल. मी 33 वर्षाचा आहे आणि ही वेळ संसारात पडण्याची आहे. कॅटरिनालाही हेच हवंय. मी लहानाचा मोठा अशा कुटुंबात झालोय की जिथं चित्रपटच सर्वकाही आहे. अशात मी गॉसिपचं महत्त्व समजतो आणि माझा फंडा सिंपल आहे. जिथं गॉसिप आहे तिथं कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही आणि हा सल्ला आहे स्वत:बद्दल जास्त विचार करू नये.’ 
 
रणबीर आणि कॅटरिना यांचा एकत्रपणे पहिला चित्रपट 2009 मध्ये आला ‘अजब प्रेम की गजब कहानी’. रणबीरचं पहिले दीपिका पदुकोणसोबत तर कॅटरिनाचं पहिले सलमान खान सोबत अफेअर होतं.