1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 डिसेंबर 2015 (11:52 IST)

शाहरुखने पाऊण तास पाहिली सलमानची वाट

सुपरस्टार शाहरुख खानला वाट पाहावी लागली ती पण चक्क 45 मिनिटे. सुपरस्टार किंग खानला सलमानने वाट बघायला लावली. हे सर्व घडलं 'बिग बॉस' च्या एका ट्रेलरसाठी.


 
शाहरुख 'बिग बॉस' शोमध्ये पहिल्यांदा दिसणार असून तो तिथे आपल्या आगामी चित्रपट 'दिलवाले'च प्रमोशन करणार आहे. यासाठी ट्रेलर अलीकडेच मेहबूब स्टुडिओमध्ये शूट करण्यात आलं.
 
सू‍त्रांप्रमाणे तीन वाजताची वेळ निश्चित झाली होती पण दोघंही स्टार्स उशिरा आले. तरीही शाहरुख सलमानच्या आधी पोहचून गेला आणि त्याच्या पाऊण तासानंतर सलमान पोहचला. पण या काळात किंग खानने आपले मूड न घालवता सल्लू मियांशी अजिबात तक्रारही केली नाही.