शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

सुपरस्टार राजेश खन्ना अनंतात विलिन

PR

बॉलीवुडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर विले पार्ले येथील स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षय-ट्विंकलाचा मुलगा आरव याने आपल्या आजोबांना मुखाग्नि दिला आणि ते अनंतात विलिन झाले.

काकांची अंतिम यात्रा सकाळी दहा वाजता आशिर्वाद बंगल्यातून निघून विले पार्ले येथील स्मशानभूमीत पोहचली. सजवलेल्या खुल्या ट्रकवरत्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. अंतिम यात्रेत त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

चित्रपटसृष्टीतील कलाकार, नातेवाईक, सहय्योगी, चाहते सगळ्यांनीच काकांना साश्रू नयनांनी श्रध्दांजली वाहत त्यांचा अखेरचा निरोप घेतला. काकांनी बुधवारी दुपारी त्यांच्या आशिर्वाद बंगल्यावर जगाचा अखेरचा निरोप घेतला होता. त्यावेळी त्यांच्याजवळ पत्नी डिंपल, दोन मुली ट्विंकल व रिंकी, जावई अक्षय कुमार आणि इतर नातेवाईक उपस्थित होते.

२९ डिसेंबर १९४२ मध्ये पंजाबमध्ये जन्मलेल्या राजेश खन्ना यांनी १९६९ ते १९७२ या कालावधीत सलग १५ हिट चित्रपट दिले होते. हा एक विक्रम आहे. १९६७ मध्ये आखरी खत या चित्रपटापासून त्यांनी आपल्या कारकीर्दीस सुरूवात केली होती.

PR

हिंदी चित्रपटसृष्टीतील अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, अरबाज खान, यश चोप्रा, कतरिना कैफ, अन्नू मलिक, ऋषी कपूर, रणजित, साजिद खान, जया प्रदा, राज बब्बर, जावेद अख्तर, इस्माईल दरबार आदी मंडळींनी आशीर्वाद बंगल्यावर जाऊन "काकां'चे अंत्यदर्शन घेतले.

PR

PR

PR

PR

PR