शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

हिम्मतवाला फ्लॉप होण्याची ५ कारण

PR
हिम्मतवाला कडून चित्रपटसृष्टिस मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र तिकीट खिडकीवरील आकडेवारी बघितल्यास हा सिनेमा फ्लॉप झाल्यात जमा आहे. चित्रपट का आपटला व प्रेक्षकांच्या पसंतीस का उतरला नाही, हे जाणून घेऊ या.

१) चूकीची निवड: साजिद खानने रिमेक साठी 'हिम्मतवाला' चूकीचा चित्रपट निवडला आहे. हा सिनेमा क्लासिकही नाही आजच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे कथानकही यात नाही.

२) अति आत्मविश्वास: साजिद खानने अतिआत्मविश्वासाच्या भरात या सिनेमाचा रिमेक बनवला आणि प्रेक्षकांच्या माथी मारला व तो प्रेक्षकांनाही पसंत पडेल, असे गृहित धरले.

३) आउटडेटेड कथानक: हिम्मतवाला सिनेमाचे कथानक आउटडेटेड आहे. यामध्ये तोच तो रटलेला फॉर्म्यूला वापरण्यात आला आहे.

४) असहज अजय: चित्रपटातील कित्येक दृश्यांमध्ये अजय देवगन असहज दिसतो. याचा असर त्यांच्या अभिनयावरही पडला असून चित्रिकरणाच्या दरम्यानच आपण फसल्याचे अजयच्या लक्षात आले असणार.

५) साजिदचे मोठ-मोठे दावे: मी कधी फ्लॉप चित्रपट बनवूच शकत नाही. माझा चित्रपट बेस्ट आहे. सिनेमा २०० कोटींचा व्यवसाय करेल. यासारख्या वक्तव्यांमुळे प्रेक्षक अगोदरच नाराज झाला आणि चित्रपटाकडे पाठ फिरवून बसला.