Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 16 फेब्रुवारी 2009 (19:52 IST)
राष्ट्रीय तपास संस्थेसाठी 1466 कोटी
मुंबईवरील दहशतवादी हल्यानंतर स्थापन केलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेसाठी केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात 1466 कोटीची तरतूद केली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयातंर्गत काम करणार्या राष्ट्रीय तपास संस्थेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करुन संस्थेला बळकटी देण्याचे प्रयत्न सरकारने सुरु केले आहे. पोलिस व्यवस्थेसाठी मागील अर्थसंकल्पापेक्षा10336 कोटी रुपये या वेळी ठेवण्यात आले होते. सन 2008-09 मध्ये 21715 कटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.