नवी दिल्ली- बुधवारी गुरुपौर्णिमा आहे. यापूर्वीच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ज्या विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आणि पहिल्यांदा नोकरी केली, त्या पंजाब विद्यापीठाला ५० कोटीची गुरुदक्षिणा दिली आहे.
नवी दिल्ली- दिल्लीत 2010 वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांसाठी सरकारने अर्थसंकल्पात खास तरतूद केली आहे. बजेटमध्ये सरकारने 3,472 कोटी या स्पर्धेसाठी दिले आहेत.
नवी दिल्ली- दरवर्षीच्या पावसाने मुंबई जलमय होत असल्याने केंद्र सरकारने पहिल्यांदाच ही बाब गांभीर्याने घेतली असून, मुंबईतील 'ब्रिमस्टोवॅड' या प्रकल्पासाठी 500 कोटीची तरतुद करण्‍यात आली आहे.
नवी दिल्ली, दि. ०६ जुलै, (हिं.स.) - देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा सर्वांत मोठा म्हणजे दहा लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक असलेला, २००९ - १० या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रिय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज सोमवारी लोकसभेत सादर केला. युपीए ...
नवी दिल्ली अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवली असून याचा फायदा प्रामुख्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. महिलांसाठीच्या करमुक्त उत्पन्नात दहा हजारांनी तर ज्येष्ठ नागरिकांसाठी १५ हजारांनी वाढ केली आहे.
सरकारने देशाच्‍या अर्थव्यवस्थेला जागतिक आर्थिक मंदीच्‍या फटक्यापासून वाचविण्‍यासाठी रोजगार आणि सरकारी प्रकल्‍पांना दिलासा देत त्‍यांच्‍यासाठी वेगवेगळ्या माध्‍यमातून 1.86 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या शिवाय करात सवलत देताना तीन ...
नवी दिल्ली (भाषा) मुंबईतील २६ नोव्हेंबरमध्ये झालेला हल्ला लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संरक्षणासाठी भरीव तरतूद केली असून गतवर्षाच्या तुलनेत लष्करी खर्चासाठी ३४ टक्के वाढ केली आहे. आता हा खर्च १ लाख ४१ हजार ७०३ कोटींचा होईल.
नवी दिल्ली अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी जाहिर केलेल्या आजच्या अर्थसंकल्पात 'युपीए' सरकारचा मुख्य मतदार असलेल्या 'आम आदमी'वर विशेष भर देण्यात आला आहे. 'आम आदमीसाठी' यापूर्वी जाहिर केलेल्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यावरच्या निधीत भरघोस ...
नवी दिल्ली- मोठ्या स्क्रीन असलेला टीव्ही पाहण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी खूश खबर असून, केंद्र सरकारने आपल्या बजेटमध्ये लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (एलसीडी) वर लागणारा सीमा शुल्क 5 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली- अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी वकिलांसाठी अर्थसंकल्पात सेवा कर देण्याची घोषणा केली असून, देशभरातील वकिलांनी आणि त्यांच्या संघटनांनी याचा निषेध केला आहे.
नवी दिल्ली- अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. देशातील अल्पसंख्याकांसाठी यात खास तरतूद करण्यात आली असून, त्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी १७४० कोटी रुपयांची तरतूद सरकारने यात केली आहे.
नवी दिल्ली केंद्रिय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी महाराष्ट्रातील शेतकरी डोळ्यासमोर ठेवून कृषी कर्ज माफ करण्याचे पॅकेज आणखी सहा महिन्यांपर्यंत वाढवले आहे. दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असणार्‍या शेतकर्‍यांनी घेतलेल्या कर्जाच्या फक्त ७५ टक्केच रक्कम ...
नवी दिल्ली काही जीवनरक्षक औषधे आता स्वस्त होतील. अर्थमंत्र्यांनी आज या औषधांवरील सीमा शुल्कात सवलत देण्याचे जाहिर केले. इन्फ्लुएंझा लसीकरण, स्तन कॅन्सर, रूमेटिक आर्थरायटिस आदींवरील उपचारांसाठीची ही औषधे आहेत.
नवी दिल्ली- अर्थसंकल्पात प्रणव मुखर्जी यांनी लष्करी जवानांसाठी खास तरतुद करण्‍याची घोषणा केली असून, जवानांसाठी आणि ज्यूनिअर कमिशन ऑफीसर्स अर्थात जेसीओंच्या पेंशनमध्ये वाढ करण्‍याची घोषणा केली आहे.
या वर्षी एप्रिल-मे दरम्‍यान होणा-या निवडणुकीवर खर्चासाठी सरकारने 850 कोटी रुपयांची तरतुद अर्थसंकल्‍पात केली आहे. कार्यवाहू अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत सादर केलेल्‍या हंगामी अर्थसंकल्‍पात या खर्चाची तरतुद करण्‍यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अर्थसंकल्पात 850 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने आज मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात ही तरतूद केली आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्यानंतर स्थापन केलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेसाठी केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात 1466 कोटीची तरतूद केली आहे.

रुपया असा येणार... असा जाणार

सोमवार,फेब्रुवारी 16, 2009
यंदाच्‍या अर्थसंकल्‍पात सरकारकडे येणा-या प्रत्‍येक रुपयातील 29 पैसे कर्जाच्‍या रकमेतून येणार आहे. तर खर्चातील प्रत्‍येक रुपयामागे 13 पैसे देशाच्‍या सुरक्षेसाठी खर्च होणार आहे.
नवी दिल्ली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळजीवाहू अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात 'आम आदमी' ला मदतीचा 'हात' देऊन त्याची निवडणुकीत 'साथ' मिळेल याची तरतूद करून ठेवली. मात्र, आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर बजेटकडून ...
निवडणुकीच्‍या तोंडावर मतदार आणि उद्योजकांना खूश करण्‍याचा प्रयत्‍न करताना एकीकडे सरकार अपयशी ठरले असताना संपुआ सरकारच्‍या हंगामी अर्थसंकल्‍पाबाबत विरोधकांनी त्‍यांच्‍यावर तोफ डागली आहे.